सामाजिक

खापा (तुमसर) येथे वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली

खापा : २३ फरवरी २०२५
ग्रामपंचायत खापा,पशुवैद्यकीय दवाखाना खापा, प्रहार दिव्यांग क्रॅांती संघटना व परमात्मा एक मानव विकास यांच्या संयुक्त विद्यमान वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.
संत याप्रसंगी डॅा. नंदेश्वर (पशुधन विकास अधिकारी) व राजेंद्रभाऊ पिकलमुंडे (सामाजिक कार्यकर्ता) रोशनभाऊ मने यांनी सांगीतल की, संत गाडगेबाबा यांनी आपल्या समाजासाठी मोलाचे कार्य केले, भूकेलेल्यांना -अन्न, तहानलेल्यांना – पाणी, उघड्या नाघड्यांना – वस्र, दिव्यांगाना – मदत असे अनेक मोलाचे कार्य गाडगेबाबा यांनी केले. मुख्यत्वे त्यांनी स्वच्छतेला महत्व दिले आणि गावोगावी खेडोपाडी जाऊन समाजाला स्वच्छतेचा मंत्र दिला.
याप्रसंगी कार्यक्रम चे उद्घाटक डॅा. मनोजकुमार नंदेश्वर (पशुधन विकास अधिकारी) अध्यक्ष राजेंद्रभाऊ पिकलमुंडे (सामाजिक कार्यकर्ते) रोशनभाऊ मने ग्रा.पं. सदस्य,शेषरावजी गणविर (प्रहार दिव्यांग संघटना तुमसर तालुका प्रमुख) तसेच परमात्मा एक मानव विकास चे पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण प्रतीनीधी : यादवराव बुराडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button