गायमुख यात्रेनिमित्त आमदार राजु कारेमोरे यांची भेट…
संंपुर्ण महाराष्ट्र राज्यातील नंबर १ नेटवर्क
पोलीस कि आवाज न्युज
तुमसर वार्ता:- महाशिवरात्री निमित्त गायमुख लहान महादेव म्हणून प्रसिद्ध आहे गायीच्या मुखातून पर्वतीय झरा सतत वाहून एका जलकुंभात पडते, भगवान भोलेनाथ त्यांच्या दर्शनाला लाखोच्या संकेत भक्तगण येतात त्यानिमित्त आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र यांनी गायमुखला भेट देऊन निरीक्षण केले, काही दिवसात यात्रेला सुरुवात होणार आहे, त्यानिमित्त यात्रेमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना, युवा मित्र, छोटे -मोठे व्यवसा यिक, बालगोपाल, यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये, यात्रा शांततेने पार पडावी, याकरिता तुमसर पंचायत समिती सभापती सौ. दिपीका गौपाले ,सरपंच गोपीचंद बावनकर प्रमुख अधिकारी, तहसीलदार मोहन टीकले, आंधळगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यकपोलीस निरीक्षक सुनील राऊत ,

अग्निशामक दल, आरोग्य विभाग, साफसफाई कर्मचारी, नगरपंचायत ग्रामपंचायत, प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, यांनी सहकार्य करून गायमुख यात्रेत शांततेने पार पाडावी असे असे आव्हान आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी केले, त्यावेळी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ता, मंदिर कमिटीचे सदस्य गण, ग्रामवाशी, प्रामुख्याने उपस्थित होते.
