4 वर्षाच्या चिमूरडीवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध
भंडारा जिल्हा वार्ता:- दिनांक 14/02/25 ला महिला अधिकार समाजिक संघटना तर्फे करजगी (ता. जत) येथे पांडुरंग सोमनिंग कळ्ळी (वय 45) या नराधमाने चार वर्षांच्या चिमुरडीचा खून केल्याचे गुरुवारी उघड झाले होते. याबाबत अधीक्षक घुगे म्हणाले की, गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास करजगी येथील घरातील लोखंडी पेटीत बालिकेचा मृतदेह आढळून आला. त्याची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने तो पोत्यात घातला होता. करजगी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना अत्यंत निर्दयी, माणुसकीला काळिमा फासणारी व वेदनादायी असून, या घटनेचा निषेध करते. या प्रकरणी अत्यंत कमी कालावधीत पंधरा दिवसात दोषारोपपत्र दाखल करावे अशी विनंती आहे. व पीडितेच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळण्यात यावी असे निवेदन आमच्या संघटनेतर्फे करत आहोत. असे निवेदन महिला अधिकार सामाजिक संघटना तर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी महिला अधिकार सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा नम्रता बागडे , मनीषा भांडारकर, सीमा काळे, शितल धकाते, प्रतिमा गोस्वामी, ज्योती मलोडे, मनोज चवरे, मृणाली गजभिये इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
