जिल्हा पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांनी घेतला आढावा बैठक…
भंडारा जिल्हा:-जिल्हातील सर्वच पोलीस स्टेशन, उपविभाग येथील प्रलंबित गुन्हे याची आढावा बैठक अड्याळ पोलीस स्टेशन ला संपन्न झाली. जिल्हा गुन्हे शाखेची बैठक नेहमी मुख्यालयात व्हायची परंतु आता ती बैठक *मा. नुरुल हसन पोलीस अधीक्षक भंडारा* यांच्या संकल्पनेतून मुख्यालयाबाहेर अड्याळ पोलीस स्टेशन ला 15 फेब्रुवारी 2025 ला घेण्यात आली. मागे पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या गोबरवाही पोलीस स्टेशन मध्ये 2024 ला आढावा बैठक घेतली होती. ह्या बैठकीत जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, 2024 मध्ये उत्कृष्ट कार्य करणारे 9 अधिकारी, पोलीस दलास सहकार्य करणारे चिखला येथील करीम याकुब सैयद, आरीफ सलाम शेख, पहेला येथील पोलीस पाटील श्री. चन्द्रशेखर सदाशिव खराबे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

पोलीस अधीक्षकांकडून प्रलंबित गुन्हे ची माहिती देऊन तपासणी संबधाने मार्गदर्शन देण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशन मध्ये अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. क्राईम आढावा बैठकीत अड्याळ पोलीसांनी झाडे🌲🌳🌴 लावा झाडे जगवा व पर्यावरण वाचवा असा संदेश देत पोलीस अधीक्षक नुरुल हसन , उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी वृक्षारोपण केले. तसेच सर्वच पोलीस अधिकाऱ्यांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले. *मा. नुरुल हसन पोलीस अधीक्षक* अड्याळ पोलीस स्टेशन येथील पहेला गावात जाऊन गावऱ्यांशी संवाद साधुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.




