सामाजिक
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समिती भंडारा मागील वर्षी झालेल्या हिशोबाची बैठक
भंडारा वार्ता:>दिनांक 4 फेब्रुवारी ला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समिती भंडारा 2024 ला झालेल्या सर्व कार्यक्रमाची हिशोबाची बैठक आयोजित केलेली आहे. सदर बैठकीला सर्व जेष्ठ नागरिक, महिला व युवा वर्गांनी बैठकीला हजर राहावे असे आव्हाहन समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. आपण संपूर्ण वर्षात किती कार्यक्रम केले व किती खर्च लागला या बद्दल सर्व माहिती आपल्याला या बैठकीमध्ये देण्यात येईल व येणाऱ्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ची रूपरेषा आखली जाईल तरी भंडारा शहरातील सर्व नागरिकांनी या बैठकीला उपस्थित राहावे. बैठक ही सायंकाळी 5.00 वाजता “आनंद बौद्ध विहार” जकातदार विद्यालय जवळ भंडारा येथे आयोजित केलेली आहे.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समिती भंडारा .




