Uncategorized
महाराष्ट्राची निराशा करणारा बजेट -माजी आमदार चरण वाघमारे
तुमसर वार्ता:-महाराष्ट्राची निराशा करणारा अर्थसंकल्प-चरण वाघमारे भंडारा-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अर्थ संकल्प केवळ दोन राज्यासाठी च दिसून आला .बिहार आणि आंध्र या दोन राज्यातील नेत्यांना खुश करून केंद्राची सरकार वाचविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असून महाराष्ट्राला काही न देता फक्त भोपळाच मिळाला आहे .या अर्थ संकल्पात शेतकऱ्यांच्या आत्मथत्त्या रोखण्यासाठी कुठलीही उपाययोजना दिसून येत नाही , बेरोजगारां रोजगाराच्या संधी नाही . महाराष्ट्र आणि विधर्भाला काहीच नाही , एकंदरीत महाराष्ट्राची निराशा करणारा अर्थसंकल्प आहे असे परखड मत माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेश पक्ष शरद चंद्र पवार यांचे भंडारा जिल्हा अध्यक्ष चरण वाघमारे यांनी व्यक्त केले.