अवैध रेती ट्रॅक्टर वर पोलीसांची मोठी कार्यवाही…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील सिहोरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजय कसोधन व त्यांचे कर्मचारी राजु साठवने आणि तिलक चौधरी गस्ती वर असतांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार एल पी ट्रक क्रमांक MH-40 CD3627 मध्ये मध्यप्रदेश तुन अवैध रेती भरून महाराष्ट्रात वाहतूक करतांना आढळुन आले. ट्रक चालक नामे अंकित कुमार यादव राह. दौलतपुर जिल्हा भोजपुर (बिहार) यांना रॉयल्टी बाबत विचारले असता मध्यप्रदेशातील ईटीपी सादर केली परंतु महाराष्ट्रातील रेती वाहतूकीचा कोणताही परवाना सादर न करता अवैधरित्या रेती भरून महाराष्ट्रातील महसूल विभागाला बुडवण्याच्या रेती चोरी करतांना मिळुन आल्यानै त्यांच्या ताब्यातील 4.5 ब्रास रेती किंमत 9हजार तसेच ट्रक ची किंमत 40,00000 लक्ष असे एकूण 40 लक्ष 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.आणी पोलीसांनी अप. क्र. 15/25 कलम 303 (2) भान्यास. 2023सहकलम 48 (8) जमीन महसूल सहिंता सन 1966 अन्वये गुन्हा नोंद करुन पोहवा मनोज ईनवाते करीत आहेत. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन भंडारा , अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोपने यांच्या मार्गदर्शनाखाली सिहोरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय कसोधन व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी करीत आहेत.




