योगेश्वर घाटबांधे यांना गोळा फेक मध्ये कांस्य पदक
पोलीस कि आवाज न्यूज
भंडारा वार्ता:- पॅरालिंपिक असोशिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मार्गदर्शनाखाली, पॅरालिंपिक असोशिएशन ऑफ कोल्हापूरच्या वतीने आयोजित चौथी पॅरा एथलेटिक्स चॅम्पियनशिप राज्यस्तरीय दिव्यांगांची क्रिडा स्पर्धा, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला संपन्न झाली. त्यात महाराष्ट्रातील जवळपास ३० जिल्ह्यातील २७० दिव्यांग खेळाडू यांनी सहभाग घेतला होते. भंडारा जिल्ह्य़ातील ४ खेळाडू सहभागी झाले होते. त्यात योगेश्वर रविंद्रजी घाटबांधे यांनी F-५६ गटात, गोळा फेक प्रकारात कांस्य पदक राज्य संघटना चे अध्यक्ष नंदकिशोर नाले सर पुणे यांच्या हस्ते मेडल आनि प्रमाणपत्र देण्यात आले.
श्री.योगेश्वर रविंद्रजी घाटबांधे राहणार किटाडी यांची ही १९ वी राज्यस्तरीय स्पर्धा होती व हे त्यांचे विसावे कांस्य पदक आहे.
योगेश्वर रविंद्रजी घाटबांधे हे शिव छत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार प्राप्त पॅरा एथलेटिक्स नॅशनल खेळाडू असून त्यांनी आता पर्यन्त ४ आंतरराष्ट्रीय स्पर्धा ९ राष्ट्रीय स्पर्धा, १९ राज्य स्तरीय स्पर्धा मधे ५८ मेडल्स प्राप्त केले आहेत. पुढील २३ वी राष्ट्रीय स्पर्धा चेन्नई येथे फेब्रुवारी मध्ये १७ ते २१ दरम्यान होणार आहे. योगेश्वर रविंद्रजी घाटबांधे हे भंडारा जिल्हाचे कर्णधार असुन भंडारा, गोंदिया जिल्हाचे मार्गदर्शक पण आहेत. राष्ट्रीय स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी भंडारा, जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा, डॉ. प्रशांत पडोळे खासदार भंडारा/गोंदिया जिल्हा तसेच साकोलीचे आमदार नाना पटोले साहेब प्रदेश अध्यक्ष कांग्रेस यांनी अभिनंदन केले व शुभेच्या दिल्या.