Uncategorized

बुटी हायस्कूल मध्ये विविध खेळ व आनंद मेलाचे आयोजन …

गोबरवाही :-बौद्धिक विकासाबरोबर विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक विकास व्हावा या उद्देशाने बुटी हायस्कूल गोबरवाही येथे विविध खेळ व आनंद मेलाचे आयोजन दि 22 23 24 जानेवारीला करण्यात आले यामध्ये 100 मीटर रेस बटाटा रेस चमचा गोळी बोरा रेस दोरीवरच्या उड्या लंगडी लांब उडी सुई धागा रेस असे वैयक्तिक तर कबड्डी खो-खो असे सांघिक खेळ घेण्यात आले.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा करिता दि 24 जानेवारीला आनंद मेला आयोजन करण्यात आले यामध्ये विविध व्यंजनाचे जसे डोसा भेल फिंगर समोसा गुलाब जामून उसाचा रस बोर जाम असे वेगवेगळे 40 विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले होते कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्याध्यापक श्री एम एन पवनकर सर तथा मुख्याध्यापक जे.एम चिरवतकर यांच्या हस्ते झाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक पंजाब राठोड मनोज बरकडे, तेजबहादुर यादव, राजेश उके, लक्ष्मी मते, वैशाली हटवार, सिमरन चौधरी, ज्योती लांजेवार ,शिपाई विठ्ठल पवनकर परमेश्वर देशमुख तथा विद्यार्थ्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button