सामाजिक
प्रहार दिंव्याग संघटना तुमसर तर्फे दिव्यांग व निराधार यांना तात्काळ मासिक मानधन मिळाव या संदर्भात मा. तहसीलदार तुमसर यांना निवेदन सादर
तुमसर वार्ता-तिळ गुळ घ्या गोड-गोड बोला असे प्रत्येक मकर संक्रॅातीला आपण बोलत असतो व तिळ संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो.परंतु मागील ३ महिन्या पासुन दिंव्याग व निराधार यांच मासिक मानधन न मिळाल्याने त्यांची तिळ संक्रांत एकदमच कडू झाल्याचे चित्र संपुर्ण तुमसर तालुक्यात पाहायला मिळत आहे.
दिव्यांग व निराधार यांच थकीत मासिक मानधन तात्काळ त्यांना मिळाव या करीता प्रहार दिंव्याग संघटनेचे तुमसर तालुका प्रमुख सन्माननीय शेषरावजी गणविर व त्यांच्या चमूनी मा.तहसीलदार साहेब तुमसर यांना निवेदन सादर केले.
दिव्यांग व निराधारांना त्यांच थकित मासिक मानधन लवकरात लवकर मिळाव या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी टवरचंद हाडगे प्रहार सेवक,यादवराव बुराडे (परमात्मा एक मानव विकास) रमेश ठवकर यांनी उपस्थीती दर्शविली.



