सामाजिक

उद्देशिका वाटप करुन संविधान दिवस साजरा…

तुमसर वार्ता:-

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला. यानंतर, १ वर्षानी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी देशात राज्यघटना लागू करण्यात आली. सन २०१५ पासुन भारत सरकारने “२६ नोव्हेंबर” हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.**संविधान दिनाचे औचित्य साधून आज खापा (तुमसर) येथे प्रहार दिंव्याग क्रॅांती संघटना व परमात्मा एक मानव विकास यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे संविधान उद्देशिका वितरीत करुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला**याप्रसंगी सर्व अंगणवाडी,जि.प.शाळा,ग्रा.प.कार्यालये,शासकीय दवाखाने,खाजगी दवाखाने,खाजगी शाळा,कॅालेज येथे भारताचे संविधान उद्देशिका वितरीत करण्यात आले**याप्रसंगी श्री शेषराव रविचंद गणविर (प्रहार दिंव्यागक्रॅांती संघटना,तुमसर तालुका प्रमुख),श्री यादवराव डी.बुराडे (परमात्मा एक मानव विकास) तसेच दिंव्याग बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्देशीका वितरीत केल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button