क्राइम
वाघाने नाकाडोंगरी वन परिक्षेत्रात दक्षक दिली…
वाघाने एका गाईची केली शिकार
भंडारा वार्ता:-नाकाडोंगरी वन परि क्षेत्रातील दुपारी 12 वाजे कुरमुडा गावातील शेतकरी मानिक राऊत यांच्या गाईला कुरमुडा-आसलपाणी सीमेलगत जंगलातील तलावात चरत असलेल्या गाईची शिकार केली.मृत पावलेल्या गाईचा पंचनामा तुलसीदास गौपाले, कमलेश अनकर व पोलीस पाटील विजय बावने यांच्या उपस्थितीत प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. वनपरिक्षेत्र अधिकारी जे. एस. बेले , बिट वनरक्षक कु. के. एस. मेश्राम यांनी केला.
कुरमुडा ग्रामपंचायत चे सरपंच सौ. सिता नागपुरे यांनी शेतकरी मानिक राऊत यांना मृत गाईचा मोबदला लवकरात लवकर मिळण्याची मागणी केली.
ह्या घटनेमुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.




