Uncategorizedशालेय
अश्विनी यांना पी एच डी डीग्री
-:दुर्गाप्रसाद पांडे (कोंढाली प्रतिनिधी)
अश्विनी कृष्णराव राऊत यांना महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा येथून पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. अश्विनी राऊत यांना *नागपूर महानगरपालिकेचे वर्षे २०१४ते२०१९ या कालावधीत लोककल्याणकारी योजनांचा *समिक्षात्क अध्ययन या विषयावर संशोधन कार्यासाठी पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. अश्विनी कृष्णराव राऊत यांनी यापूर्वी*भारत सरकारच्या डायस्पोरा निती के उद्भव और विकास का अध्ययन* या विषयावर एम . फिल (सुवर्ण पदक) ची पदवी बहाल करण्यात आली आहे. अश्विनी राऊत या अल्प उत्पन्न असलेल्या अत्यंत सामान्य कुटुंबातून येतात. पीएचडी पदवी मिळाल्यानंतर कोंढाळी/काटोल परिसरातील शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय संघटनांतर्फे अश्विनी यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात येत आहे.