सामाजिक
वार्षिक हरीनाम सप्ताह साजरा केला
राजेश ऊके द्वारा प्रकाशित
तुमसर वार्ता:-दरवर्षी प्रमाने ह्या वर्षी सुध्दा महात्मा गांधी चौक येथे पुरातन घुम्या देव मंदिरात दोन दिवस हरीनाम सप्ताह साजरा करण्यात आला.
पहिल्या दिवशी दिप प्रज्वलित करुन पुजा अर्चना करण्यात आली.
रात्री जागृती चा कार्यक्रम घेण्यात आला.
दुसऱ्या दिवशी दहीकाला कार्यक्रम होऊन भजन, किर्तन ज्योती नागपुरे यांनी केला.
सुमीत गौपाले सरपंच, विजय राऊत उपसरपंच, निरंजन गौपाले ग्रा. प.सदस्य व रामुजी रोटकर यांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडली व प्रसाद देण्यात आले .
कार्यक्रमाचे समापण आदिवासी गोवारी समाज व ग्रामवासी यांनी केला.



