तुमसर रोड-तिरोडी लोकल ट्रेनच्या अपघातात एक पट्टेदार वाघीन घायल.
नाकाडोंगरी (भंडारा) :-तुमसर च्या पलीकडे चिचोली -गोबरवाही-नाकाडोगरी रस्त्यावर रात्री आणि दिवसा जंगल परिसरात मुक्त संचार करत असल्याची माहिती समोर येत आहे.ह्या विषयावर वनविभागाने चिंतन करण्याची गरज आहे.

तसाच एक प्रकार तिरोडी तुमसर रोड वर पट्टेदार वाघ फिरत असुन डोंगरी बुजुर्ग रेल्वे स्टेशन च्या पुर्वी पडणारी पहाडी वर वाघ रेल्वे पटरी वरुन जात असताना त्याची शेपूट ट्रेनच्या चाकात फसुन कापल्या गेली हि माहिती मिळताच प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे नाकाडोंगरी आपल्या टीम सोबत घटनास्थळी पोहोचल्या तसेच उपवनसंरक्षक राहुल गवई, acf रितेश भोंगाडे, वनक्षेत्रधिकारी तुमसर सी जे. रहांगडाले, गोबरवाही-पोलीस , रेल्वे अधिकारी हे सर्व रेस्क्यू ऑपरेशन मध्ये व्यस्त झाले. ह्या घटनेमुळे मालगाडी वैगेरे चा यातायात सुरु होऊ शकला नाही. काही वेळातच नागपूर गोरेवाडा हॉस्पिटलमध्ये वाघाला नेण्यात आले.



