बेपत्ता आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार- मा.आमदार चरण वाघमारे
पोलीस कि आवाज न्युज
भंडारा (गोबरवाही-) -तुमसर तालुक्यातील सुंदरटोला गावातील ताराचंद कुंबरे चंद्रकला इनवते व मीना सर्याम बेपता प्रकरणात पोलीस प्रशासनाची दिरंगाई पाहता अद्यापही या तिघांचा शोध लावण्यात पोलीस प्रशासनाला यश आले नसून या आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून प्रसंगी जन आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही असा ईसारा मा. आमदार चरण वाघमारे यांनी प्रशासनाला दिला आहे.
२० ते २५ दिवसापासून सुंदरटोला निवासी ताराचंद कुंभरे, चंद्रकला इनवाते व मीना सरयाम हे एकाच परिवारातील चुलत भाऊ बहीण बेपत्ता आहेत.बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस प्रशासन व महसूल विभागाला दिली असतानाही अद्याप पर्यंत बेपत्तांचा शोध लावण्यात पोलीस प्रशासनाला यश आले नाही.एकीकडे लाडक्या बहिणींचा गाजावाजा करून मतावर डोळा ठेवण्याचा धडाका सुरू असताना दुसरीकडे बेपत्ता लाडक्या बहिणींचा व भावाच्या शोध घेण्यासाठी गृह विभाग आणि कृषी विभागाचे सर्वेसर्वा लक्ष का देत नाही?हा सुद्धा एक शंकेचाच विषय आहे.
बेपत्ता ताराचंद कुंबरे यांचे तक्रारीनुसार त्यांनी आपली जमीन नागपूर येथील एका इसमास पाच वर्षाकरिता मग्निज प्रोसेससाठी भाडेतत्त्वावर दिली असताना संबंधिताने या भाडेतत्त्वाच्या कागदपत्रात फेरफार करून पाच वर्षा ऐवजी पंचवीस वर्षे केले असल्याची बाब तक्रारदार ताराचंद कुंभरे यांच्या लक्षात आल्याने न्याय मिळणे संबंधाने महसूल विभागाकडे तक्रार देऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने वेळेची योग्य कारवाई केली नाही म्हणून आज एकाच परिवारातील चुलत भाऊ बहीण असे तीन इसम बेपत्ता आहेत.त्यांचेसोबत कदाचित घातपात्र तर झाला नसावा? ही शक्यता नाकारता येत नाही.
या संबंधाने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोदजी वटी यांनी प्रशासनास बेपत्ता इसमांचा शोध घेऊन न्याय देण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने संबंधित विभागाने बेपत्तांचा तात्काळ शोध लावावा अन्यथा प्रसंगी जनआंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार चरण वाघमारे यांनी दिला आहे.