आदिवासी समाजातील वक्ती हरविल्याने क्षेत्रात हडकंप…
गोबरवाही वार्ता:- तुमसर तालुक्यातील 20 ऑक्टोबर ला सुंदरटोला गावातील ही घटना समोर येत आहे. ह्या गावात तिन आदिवासी व्यक्ती👤👤👤 दिसत नसल्याची घटना घडलेली आहे. सुंदरटोला निवासी ताराचंद सुजन कुंभरे हा व्यक्ती कोणत्याही व्यक्ती ला सांगता घरुन निघून गेला त्याचप्रमाणे सौ. मिना अर्जुन सरियाम (34) ही धान कापणी साठी गेली होती परंतु घरी काही वापस गेली नाही अशाच प्रकारे 22ऑक्टोंबरलाच चंद्रकला सेवक ईनवाते (50) ही सुद्धा महिला धान कापणी साठी गेली असता आतापर्यंत घरी वापसी न आल्याची माहिती मिळत नाही. हे सर्व एकाच परिवारातील सदस्य असुन गोबरवाही पोलीस स्टेशनला मामला दर्ज आहे.
पोलीस सब ईन्सपेक्टर गिते गोबरवाही यांना याबद्दल माहिती विचारणा केली असता निवडणूक कार्यक्रमात व्यस्त असल्याचे बोलले.
पोलीस विभाग ह्या विषयाकडे गंभीर का नाही? . ह्या सर्व बाबीमुळे गोबरवाही पोलीसांवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.