शालेय
कु. अपेक्षा धायगुळे चा नवोदय परीक्षेत सुयश…
तुमसर वार्ता- नाकाडोंगरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पाथरी गावातील अपेक्षा धायगुळे ही विद्यार्थ्यांनी नवोदय परिक्षेत पात्र झालेली असुन कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला तसेच मंथन परीक्षेत सुध्दा जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक प्राप्त केला. अशा होतकरु विद्यार्थिनी चा ग्राम पंचायत पाथरी तसेच शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. ह्या कार्यक्रमात श्रीयुत प्राचार्य ऊके सर यांनी शाळेमध्ये उत्कृष्ट कार्य केले त्याबद्दल त्यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. तसेच नवीन पदस्थ झालेल्या शिक्षकांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.




