चालत्या बसमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू
संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज मिडिया
भंडारा जिल्हा:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर बस स्थानकात एका चालत्या बस मध्ये चुन्निलाल राऊत गाव-डोंगरला येथील रहिवासी असून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे भंडारा जिल्ह्यात एकच खळबळ माजली की त्या व्यक्तीचा मृत्यू झाला कसा व तोही एस. टी. महामंडळाच्या बस मध्ये!
सविस्तर वृत्त असे की मृतक कामठी वरुन रेल्वे ने आल्यानंतर देव्हाळी वरुन गोंदिया-तुमसर -भंडारा बस क्रं. एम एच ४० एन ९२४२ ने तुमसर येथे प्रवासाकरिता बसला. ही बस भंडारा डेपो ची असल्याची माहिती पोलीस कि आवाज न्युज ला मिळाली.

तुमसर बस स्थानकापर्यंत मृतकाला चक्कर येऊन अचानक त्याची तबियत बिघडली. त्यांनी त्याचे ओळखिचे उमेश व सचिन शिवनकर यांना सांगितले व त्या दोन्ही मित्रांनी बस वाहकाला बस रुग्णालय नेण्यास सांगितले परंतु चालक व वाहक यांनी बस रुग्णालयात न नेता सरळ ती बस आगारात नेली तोपर्यंत त्या व्यक्तीची प्रकृती जास्त बिघडली.त्यांच्या मित्रासोबत वाहक व चालकाने वाद घातला, त्यानंतर त्याच्या मित्राने एका मोटार सायकल ने रुग्णालयात नेले तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ही खबर त्यांचा स्थानिक गाव डोंगरला ला माहिती पडताच मृतकाचे नातेवाईक आणि तिथले नागरिक यांनी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात व आगारात मोठी गर्दी करुन संबंधित वाहक आणि चालकावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली.



