क्राइम
लाचेची मागणी करणारा तलाठी लाचलुचपत विभागामार्फत पोलीसांच्या ताब्यात
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज मिडिया
राजेश ऊके (न्युज एडिटर)
भंडारा जिल्हा:-भंडारा जिल्ह्यातील मोहाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोहा गावात रेती तस्करी करणाऱ्या वाहन व चालकाला तलाठी वैभव जाधव यांनी पकडले. परंतु ट्रकर सोडविण्यासाठी ट्रकर चालकांकडून २५,००० रु. लाचेची मागणी केली. तक्रारदाराने पैसे नसल्याचे सांगितले वर तलाठ्याने तुमसर तुझ्यावर विश्वास ठेऊन ट्रकर सोडतो पण उद्याला रक्कम देशिल असे म्हटले परंतु तक्रारदारास लाच रक्कम देण्याची इच्छा नसुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा ईथे तक्रार दिली त्याच दिवशी तक्रारींची पडताळणी केली असता तलाठी वैभव जाधव याने पंचासमक्ष २०,००० रु. घेण्याची इच्छा दर्शविल्या ने सापळा कार्यवाही चे आयोजन करून तक्रारदारास रक्कम धरुन रवाना केले परंतु तलाठी वैभव जाधव यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराकडून रक्कम स्विकारली नाही.

ह्या प्रकरणामुळे भंडारा जिल्हात चर्चेला उधान आलेला आहे व जे भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची झोप उडाली!




