मुलीचे शासकीय वसतीगृहात अंधश्रद्धा निर्मूलन वर मार्गदर्शन
संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज
भंडारा जिल्हा:- महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडीवर विस्तृत बातमी प्रकाशित करून शासन व जनतेसमोर बाजु मांडून पोलीस कि आवाज न्युज मिडिया शासनाला जागृत करण्यासाठी प्रयास करत असतो.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा अंतर्गत तालुका विधी सेवा समिती मार्फत तुमसर मुलीच्या शासकीय वस्तीगृहात मार्गदर्शन शिबीराचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. ज्यामध्ये शासकीय वस्तीगृहात राहणाऱ्या मुलीच्या मनातील भुत प्रेत ची भिती ह्या विषयावर मार्गदर्शन व कृतीतुन त्यांच्या मनातुन भिती दुर करण्याचा प्रयत्न करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित झालेले प्राध्यापक खोब्रागडे सर यांनी मुलीला मनातुन भुताचे नाव काढण्याचे आव्हान केले तर लाखनी तालुक्यातील अनीस चे कार्याध्यक्ष अश्विनी भिवगडे यांनी दहशतीच्या वातावरणात ठेवून मानसिक गुलामगिरीत जखळुन ठेवण्याकरिता तैयार केलेली मानसिक प्रतिकृती होय त्यामुळे निसर्गात भुत प्रेत जादूटोणा या गोष्टी अस्तित्वात नाही असे त्यांनी प्रतिसादन केले.



तर अनिस चे विष्णूदास लोनारे यांनी बाबा लोकं सामान्य मानसाची कसी फसवणूक करतात व अंधश्रद्धा कसे पसरवितात यावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी एल व्ही अश्लेशा कुभंलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन वस्तीगृहाच्या गृहपाल कांता कोकाटे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पी एल व्ही बावनकर, पी एल व्ही अश्विनी भिवगडे, रक्ष्शित कांबळे, योगेस कांबळे व शासकीय वस्तीगृहाच्या सर्व विद्यार्थ्यांनी यांनी सहकार्य केले.

