राजकीय
भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीत कोणाच्या डोक्यावर ताज?
महाराष्ट्र एवं मध्यप्रदेश में एक साथ प्रसारित
पोलीस कि आवाज न्युज मिडिया
भंडारा-गोंदिया जिल्हा वार्ता:- भंडारा-गोंदिया जिल्हा लोकसभा निवडणुकांमध्ये रिंगणात असलेले एकुण अठरा उमेदवार रिंगणात लढत देत आहेत. ह्या पैकी सध्याचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांची लोकप्रियता कमी असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल सोबत असल्याने मेंढे यांची बाजु मजबुत झाल्याचे बोलल्या जात आहे.


तर काँग्रेस पक्षाचे नवीन उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे असले तरी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जनसैलाब त्यांच्या पाठिसी आहे त्याचप्रमाणे
माजी आमदार अनिल बावनकर यांचा सुध्दा वर्चस्व तुमसर-मोहाळी क्षेत्रात असल्याने ही बाब मतदानात भर घालु शकते अशा चर्चा परिसरात होत असल्याची जानकारी मिळत आहे.
काही भाजपा व काँग्रेस नेत्यांनी सुध्दा बंडखोरी केली व ते उमेदवारी रिंगणात उभे आहेत यांचे पण दुष्परिणाम ह्या पक्षाच्या उमेदवारीवर पडू शकते असे बोलले जात आहे.
उमेदवारी जिंकताना ब्रम्ह देवतांना सुध्दा माहीत नसते की कोणच्या डोक्यावर विजयाचा झंडा विराजमान होतोय.!

