प्रकल्प करमाळा तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका मदतनीस यांना जिल्हा स्तरिय पुरस्कार प्राप्त.
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क वार्ता प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र) सह संपादक

करमाळा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प करमाळा तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका मा आतकर मॅडम यांना जिल्हा स्तरिय आदर्श पर्यवेक्षिका पुरस्कार देण्यात आला, त्याच बरोबर अंगणवाडी सेविका सौ. सोनम शिंदे वाशिंबे , अंगणवाडी सेविका सौ. संगिता बनसोडे बिटरगाव, सौ. रूपाली महामुनी अंगणवाडी मदतनीस आदिनाथ कारखाना, या सर्वांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने उत्कृष्ट कार्य व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला, यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकिले, करमाळा प्रकल्प अधिकारी आनंद जाधव, बालविकास विस्तार अधिकारी संदिप रणदिवे,करमाळा पर्यवेक्षिका वंदना चोले व अंगणवाडी सेविका यांनी या सर्वांचे विशेष अभिनंदन केले




