जिल्हा

ग्रामपंचायत मांदेड/सा. यांचे कडून दिंव्याग व्यक्तीवर अन्याय..

संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहचणारा

लाखांदूर वार्ता-

सदर प्रकरण मौजा मांदेड/सावरगाव,ता.लाखांदुर,जि.भंडारा
ग्रामपंचयती संदर्भात आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की,
मांदेड/सा. ग्रा.पं. येथील सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक यांच्या तुघलकी कारभाराणे दिंव्यांग बांधव व त्यांच्या परिवाराला मानशिक व शारीरीक त्रास सहन करावा लागत आहे.
सन २०१७-१८ पासुन श्री. कैलास वकटू तलमले हे ८५ % दिव्यांग असुन त्यांना अपघातात त्यांचा एक पाय गमवावा लागला, परिस्थीती हालाखीची असल्याने त्यांनी आधार म्हणुन सासऱ्यांच्या गावी म्हणजेच मांदेड येथे राहणे सुरु केले, सासरच्या कडे किती दिवस राहणार म्हणुन त्यांनी
शासनाच्या वर्षानुवर्षे निरुपयोगी खड्डयाच्या जागेत भरन टाकुन एक टीन व पत्र्याची झोपडी उभी केली व त्यात ते आपल्या ५ लोकांच्या परिवारासह राहु लागले.
त्यांच्यावर पारिवारीक जिम्मेदारी म्हणुन दोन मुले,पत्नी व आई असुन एक पाय नसल्याने उदर निर्वाहाच काहीच पर्यांय अथवा साधन नाही,पत्नी च्या रोजी रोटीने सध्या त्यांचा ५ लोकांचा परिवार कसा-बसा चालत आहे. कमविणारे एकटीच असुन खानारे ४ लोक आहेत.


परिस्थीती ईतकी हालाखीची असतांना सुध्दा ग्रा.पं. मांदेड चे पदाधीकारी/अधिकारी त्यांचे घरी जाऊन त्यांना नेहमीच घर पाडण्या विषयी धमकी देत असतात..
ग्रामपंचायतीच्या तुघलकी कारभाराने जर त्यांच्या जिवाच काही बर वाईट झाल्यास त्याची सर्वस्सी जिम्मेदारी ग्रामपंचायत मांदेड ची राहील असा कबुली जवाब तलमले यांनी दिला आहे..

तलमले यांचा परिवार अंधारातच आपले जिवन व्यथीत करित आहे. घर टॅक्स नसल्याने विद्युत जोडणी पन मिळत नाही.
त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर फार मोठी परिणाम होत आहे. म्हणजेच ग्रा.पं.मांदेड हे त्यांच्या मुलांच्या भवितव्याशी खेळ करीत आहे. कीतपत योग्य आहे याला सर्वस्वी ग्रामपंचायत मांदेड चे सरपंचा,उपसरपंच व सचिव जबाबदार आहेत.असा कबुली जाबाब तलमले यांनी दिलेला आहे.
सदर प्रकरणा संदर्भात मा.जिल्हाधीकारी महोदयांना १३ फरवरी २०२४ रोजी निवेदन देण्यात आलेल होत, त्यांनी लाभार्थ्याला आस्वासन दिले की, आपल्या समश्यवर लवकरात लवकर तोडगा काढु आणि लकरच जि.प.भंडारा पंचायत विभागा मार्फत योग्य ती कार्यवाही करु असे सांगीतले. त्यानुसार मा.उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जि.प.भंडारा यांनी मा.गट विकास अधिकारी पंचायत समिती लाखांदुर यांना सांगीतले की, नियमानुसार योग्ये कार्यवाही करुन घरटॅक्स व गाव नमुना ८ देण्यात यावा. या आशयाचे उपमुख्याधीकारी (ग्रा.पं.) जि.प.भंडारा यांच पत्र दिनांक ०६ मार्च २०२४ ला सकाळी १०ः३० च्या दरम्यान ग्रामसेविका यांनी तलमले यांना दिले.


परंतु ग्रामपंचायत मांदेड यांनी मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्या पत्राची/आदेशाची अवहेलना करुन मा.सरपंचा यांच्या स्वाक्षरीच पत्र
दिनांक – ०७ मार्च २०२४ रोजी तलमले यांना पाठविले.
सदर पत्रात नमुद केले की, व ३(तिन) दिवसाचे आत घर खाली करावे नाहितर आम्ही पाडून टाकू व त्याचा खर्च तुमच्या कडून घेऊ असे धमकवीण्यात आलेले आहे.
यावरुन असे लक्षात येतो की ग्रा.पं. मांदेड/सा. येथील अधिकारी/पदाधिकारी हे शासकिय आदेशाला मानत नाहीत. व वैक्तीक व्देषापायी वैक्तीक स्वार्थासाठी एक गरजवंत एक पाय नसलेल्या गोर-गरीब व्यक्तीला सुळ भावनेने मुद्दाम त्रास देत आहेत. मी आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातुन प्रशासनाला अशी विनंती करतो की,
दोषीवर योग्य ती कार्यवाही करावी. व आमच्या दिव्यांग बांधवाला लवकरात लवकर मिळवुन द्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button