सामाजिक
जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी…

भंडारा, दि. 20 :- मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त
जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे यांनी विनम्र अभिवादन केले.

जिल्हा माहिती कार्यालयात दांदळे यांनी आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी श्री. तुषार उरकांदे, श्री. विजय जाधव, श्री. सुनिल फुलसुगे, श्री.जी.एन.सपाटे,श्रीमती. रेखा निनावे, तसेच श्री.सुरेश फुलसंगे या कर्मचाऱ्यांनी दर्पणकार बाळशस्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
००००



