राजकीय

गोंदिया -भंडारा जिल्हाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – खा. प्रफुल पटेल

गोंदिया येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

संपुर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय

NCP गोंदिया कार्यालय द्वारा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गठबंधन जरी असले तरी पार्टीचे विचार ध्येय, धोरणांशी तडजोड केलेली नाही. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात सर्वांगिण विकास व्हावा या क्षेत्रातील समस्या मार्गी लागव्यात व मोठे प्रकल्प येऊन रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी आपला सदैव प्रयत्न असणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी बोनस, दोन्ही जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी सिंचनाचे प्रकल्प असो कि अन्य कुठल्याही प्रकल्पात अडचण आल्यास आपण पुढाकार घेवून ते मार्गी लावण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

गोंदिया स्थित एन. एम.डी. महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. माजी आ.राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हयातील मान्यवर, तालुका व शहर अध्यक्ष जि.प सदस्य, प.स.सदस्य, न.प. सदस्य, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवार कोण, ही जागा कुणाच्या वाट्याला या सर्व गोष्टींवर अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही. यासंदर्भात महायुतीत सहभागी घटक पक्षाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल. परंतु महायुतीच्या उमेदवारांसोबत राहून सर्वानी महायुतीच्या उमेदवाराला साथ द्यायची आहे असे खा. प्रफुल्ल पटेल यांनी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button