सामाजिक

प्रहार अपंग क्रॅांती संघटना तुमसर तर्फे क्रॅांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

दिनांक ३ जानेवारी क्रॅांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात नायगाव या गावात झाला. त्यांनी अत्यंत बिकट परीस्थीतीत माझी माय,माझी लेकरु शिकावी आणि चुल आणि मुल याच्या पासुन दुर व्हावी या करीता त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रात स्री शिक्षणाची सुरुवात केली, म्हणुनच आज आपल्या आया-बहिणी राष्ट्रपती,आय.ए.एस.,आय.पी.एस.,सारख्या मोठ्या पदावर विराजमान होऊ शकल्या.


आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावुन स्री उभी आहे ती फक्त आणि फक्त क्रॅांती ज्योती सावित्री माई मुळे. अशा या क्रॅांती ज्योती सावित्री माई ला प्रहार अपंग क्रॅांती संघटने तर्फे विनम्र अभिवादन. आजच्या कार्यक्रमा प्रसंगी प्रामुख्याने शेषराव गणविर तुमसर तालुका प्रमुख प्रहार अपंग क्रॅांती संघटना, रविंचदजी गणविर, डॅा.सुभाष सोनवाने , प्रकाश डोंगरे, संजय ठवकर, प्रभु टेटे, उषा ठवकर, गोपिका टेटे, दुर्गा देशमुख, ईश्वर देशमुख, देवदास ठवकर, सुखदास तलवारे, भगवान ठवकर यांच्या उपस्थीतीत पार पडला..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button