जिल्हा

सेवक बांधवा तर्फे खापा येथे महाप्रसाद वितरण

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त प्रभावशाली

तुमसर वार्ता:-दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ हसारा रोड तुमसर च्या वतीने मार्गदर्शक बालुभाऊ बुध्दे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे भव्य सेवक सम्मेलन व भव्य रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले.


भव्य रथ यात्रा हि रामटेक पासुन ते तुमसर शहर पर्यंत आयोजीत करण्यात आली सदर रथ यात्रेत जवळपास २०० चार चाकी वाहनांचा समावेश असतो, रथ यात्रेचे खापा ग्राम येथे आगमन होताच महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या फोटोचे पुजन करुन स्वागत करण्यात आले, त्याच बरोबर रथ यात्रेत सहभागी सर्व सेवक बांधवांना राजेंद्र हलमारे यांच्या कडून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. विषेश सहकार्य परमात्मा एक सेवा समिती चे सर्व पदाधीकारी व सर्व सेवक गण यांनी केले.
सदर कार्यक्रमात प्रामुख्याने सहसरामजी आस्वले,राजेंद्र हलमारे,चिंतामण चौधरी,कैलास तितिरमारे,जयेश मोहतुरे,प्रकाश तुमसरे,भरत ठवकर,पुनाजी हलमारे,राजु हलमारे,केशव तुमसरे,प्रकाश ठवकर,जयराम माहुले,संजय ठवकर,जयकिशन हलमारे,श्रीकांत ठवकर,डॅा.सोनवानेजी,अनुप वहिले,प्रभा तुमसरे ,मंदराज बोंद्रे, नामदेव हलमारे, श्रीकांत ठवकर, अशय ठवकर, लक्ष्मण ठाकरे, संदीप झंझाड, राधिका चौधरी, मंगेश ठेगरी, लता ठवकर तसेच परमात्मा एक सेवा समिती तर्फे शेषराव गणविर,यादव बुराडे,नागेश शरनागत,संजय झंझाड,साहिल बडवाईक
तसेच खापा येथील सर्व सेवक-सेविकांच्या उपस्थीतीत कार्यक्रम पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button