नागपूर येथे काँग्रेस स्थापना दिनी महारॅली – नानाभाऊ गावंडे
भंडारा जिल्ह्यातील २५ हजार कार्यकर्ते “है तैयार हम” महारॅली ला जाणार! मोहन पंचभाई
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
नागपूर वार्ता:-दि. २८ डिसेंबर २०२३ रोजी १३९ वा काँग्रेस स्थापना दिन राष्ट्रीय स्तरावर मोठ्या उत्साहात साजरा करण्याबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने निर्णय घेतला असून नागपूर येथे राष्ट्रस्तरीय “है तैयार हम” या महारॅलीचे आयोजन करण्यात आहे आहे. देशाच्या विकासात कॉंग्रेसचे महत्वपुर्ण योगदान असुन ते कुणीही टाळू शकत नाही. मात्र सध्याचे सत्ताधारी कॉंग्रेसच्या योगदानाला पुसण्याचे काम करीत आहे. मात्र देशातील जनता सुज्ञ असुन सत्ताधिकाऱ्यांचा हा खेळ जनता बघत आहे. त्याचे उत्तर येणाझ्या काळात देशातील जनता नक्कीच देईल. त्याच अनुषंगाने दि. २८ डिसेंबर २०२३ रोजी काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमिवर नागपूर येथे कॉग्रेसचे राष्ट्रीय महा-संमेलन आयोजित करण्यात आले असुन महारॅली ला भंडारा जिल्ह्यातुन २५ हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीची अध्यक्ष मोहनभाऊ पंचभाई यांनी आज भंडारा येथे पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईत कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा कामगारांचा आवाज उठवण्याचे काम कॉंग्रेसने केले. दादा भाई नौरोजी, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सह जवाहरलाल नेहरू अशी अनेक नेते काँग्रेस पक्षात आले, महात्मा गांधी यांचा काळ यात महत्वाचा राहिला. देशाला स्वातंत्र मिळवुन देण्याचे काम कॉंग्रेस पक्षाने केले. काँग्रेसच्या प्रधान मंत्र्यांनी या देशाला उभे करण्याचे काम करीत देशात आर्थिक व सामाजिकळा ‘ती घडवुन आणली. व सन २०१४ मध्ये जी माणसे देशात सत्तमध्ये येताच त्यांनी देश विकण्याचे काम सुरू केले. देशात ईडी, सीबीआय या संस्थांच्या माध्यमातुन विरोधकांना संपविण्याचे काम सुरू आहे. या सगळ्या घडामोडीच्या माध्यमातुन नागपूर हा केंद्रबिंदु आहे. याच ठिकाणी २८ डिसेंबर २०२३ रोजी काँग्रेसचा आवाज बुलंद करण्याकरीता
कॉंग्रेसचे राष्ट्रीय महारॅली चे आयोजीत करण्यात आले आहे. महारॅलीला कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या आदरणीय सोनीयाजी गांधी, मा खासदार राहुल गांधी, यांच्यासह देशातील कॉंग्रेसचे मुख्यमंत्री तसेच अखिल भारतीय काँग्रेस चे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे पंचभाई यांनी यावेळी सांगीतले. भंडारा जिल्ह्यातून सर्व गाव स्थरावरून काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.

