“शासन आपल्या दारी “अभियान सुरु असतांना पत्रकारांना मुंबई ची धाव घ्यावि लागते…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
भंडारा जिल्हा वार्ता:-मागील तिन ते चार महिन्यांपासून चालु असलेले तुमसर चे वर्तमान ठाणेदार व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांच्या विरुद्ध केलेल्या तक्रारीचे निराकरण आतापर्यंत झाले नाही…!
मागे २५/०९/२०२३ ला बहुउद्देशीय हॉल भंडारा येथे तक्रार निवारण कार्यक्रमात गेले असताना मान.लोहित मतानी, पोलीस अधीक्षक भंडारा व मान.ईश्वर कातकडे,अपर पोलीस अधीक्षक भंडारा यांनी राजेश ऊके , अध्यक्ष , बहुजन मराठी पत्रकार संघ,भंडारा जिल्हा यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करिता आईपीएस अधिकारी यांची नियुक्ती केली होती परंतु आतापर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी झाली नसुन बंद गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
जिल्हात तक्रारीचे निवारण होत नसल्याने पत्रकारांना मुंबई मंत्रालयाची धाव घ्यावी लागते त्यामुळे शासन आपल्या दारी हे अभियान सुरू असुनही ते अभियान अयशस्वी ठरत आहे.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन पत्रकार/संपादक सोबत असा व्यवहार होत आहे तर सामान्य नागरिकांची समस्या निराकरण कसा होणार हा प्रश्न जनतेच्या मनात वारंवार उद्भवत आहे.




