सट्टा पट्टी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा शहरात लपुनछपून सुरू असलेल्या सट्टा पट्टी व जुगार खेळणाऱ्या आरोपी वर स्थानिक गुन्हे शाखा भंडारा ने सापळा रचून आरोपिंना ताब्यात घेतले.पोलीस अधिक्षक मान.लोहित मतानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोडकर आणि त्यांची पथक यांनी भंडारा शहरात चालु असलेले अवैध धंदे सट्टा पट्टी व जुगार खेळणारे आरोपी राजु शेंडे, रमेश हेडावु, नितीन बनकर, बाबुलाल शेंद्रे,शोहल शेख,कुश्माकर निपाने यांच्या सह ३,४६०रु.आणी सट्टा पट्टी साहित्य जप्त करण्यात आले.ह्या सर्व आरोपी वर महा.जुगार कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलीस स्टेशन भंडारा अप. क्रं.१)७४५/२०२३कलम १२(अ)महा.जु.क.सह कलम १०९भादवि अन्वे प्रत्येकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुर्यवंशी करित आहेत.



