तुमसर आगारातील तुमसर ते बावनथडी मार्गावर बस फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना संताप!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा न्युज चॅनल/नेटवर्क
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क//चॅनल
तुमसर वार्ता :- मिळालेल्या माहितीनुसार तुमसर वरुन बहुतेक प्रवासी नागपुर,नाकाडोंग-री, आष्टी, लोभी,गोबरवाही,चिचोली,साखळी,मिटेवानी,मेहगाव चिखलाफाटा,सुंदर-टोला ला दररोज महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करतात.शाळेचे विद्यार्थी सुध्दा तुमसर ला दररोज ये -जा करतात. तहसील कार्यालय व एसडीएम कार्यालय तसेच त्याच मार्गावर भंडारा जिल्हा असल्याने बहुतांश प्रवासी जिल्ह्यातील कार्यालयीन कामानिमित्त प्रवासी बसने प्रवास करतात परंतु ह्या मार्गावर बसेस कमी असल्याने प्रवाशांना खुप त्रास सहन करावा लागतो.

काही दिवसांपूर्वी तुमसर ने बावनथडी सायंकाळचे ६ वाजेची बस फेरी बंद झाली त्यामुळे तर एसटी महामंडळाचा प्रवाशांवर जखमेवर मीठ चोळल्यासारखी स्थिती निर्माण झाली.

बातमी प्रकाशित होताच तुमसर आगार व्यवस्थापक व अधिकारी कोणती भूमिका प्रवाशांच्या सुविधेसाठी घेतात याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहे.



