Uncategorized

विद्यार्थी व प्रवाश्यांच्या सोयीसाठी तुमसर – सुसूरडोह या बसच्या वेळेत बदल करण्यात यावा : छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर शाखा बघेडा च्या वतीने निवेदन सादर.

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

तुमसर ते खापा हि बस बघेडा पर्यन्त येता येता प्रवाश्यांची गर्दी होऊन त्यात बसण्याची वा उभे राहण्याची सुद्धा जागा राहत नाही. कधी कधी तर या बस मध्ये गर्दी असल्यामुळे बघेडा बस स्थानकावर बस थांबत सुद्धा नाही त्यामुळे बघेडा येथील शाळकरी पासधारक मुले व रोज ये-जा करणार्‍या प्रवाश्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणजे जी तुमसर – सुसूरडोह बस आहे या बसच्या वेळेत बदल करणे. तुमसर – सुसूरडोह बस जी सकाळी १०.३० वा. च्या नंतर बघेडा येथे येते त्या वेळेत बदल करून सकाळी ९.१५ वा. करण्यात यावी. ज्यामुळे परिसरातील सर्व पास धारक विद्यार्थी व प्रवाश्यांच्या सोयीचे होईल. येथील रहिवासी, विद्यार्थी व पालक यांच्या अश्या स्वरूपाच्या मागणीला लक्षात घेत छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर च्या वतीने मा. आगार व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ. तुमसर आगार यांना विनंतीपूर्वक निवेदन प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात आले. निवेदनावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश आगार व्यवस्थापक श्रीमती. निमजे मॅडम यांनी आगार वाहतुक निरीक्षकांना दिले. प्रतिष्ठान च्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले या वेळी प्रतिष्ठान चे संस्थापक /अध्यक्ष इंजि. नितीन धांडे प्रतिष्ठान चे सचिव प्रा. अमोल उमरकर हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button