राज्य

एकनाथराव शिंदे “कार्यकर्ता मुख्यमंत्री”

नवी मुंबई, दि. 20 :- सकाळ उजडली ती  एक दुदैवी  घटना घेऊनच,  दि. 19 जुलैची रात्र इरशाळवाडीवरील ठाकूर जमातीतील आदिवासीसाठी काळ रात्र ठरली. मध्यरात्री लोक साखर झोपेत असतांनी निसर्गाने जणू घालाच घातला. खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळून अनेक कुटुंबे ढिगाऱ्याखाली गाढले गेले.

हे वृत्त कळताच सहदर्यी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे सहा वाजता ‘वर्षा’ बंगल्यावरुन निघाले.तेथे ते आठ वाजता पोहचेले. परिस्थितीची माहिती घेतली. घटना दुदैवी होती. हे लक्षात आले. त्यांनी लगेच शासकीय आणि निमशासकीय यंत्रणेला कामाला लावले. आणि काही क्षणात मदतीचे हजारो हात उभे राहीले. मदतकार्य जोरात सुरु होते. दुघर्टनाग्रस्तांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन मुख्यमंत्री करत होते. मदतकार्याने वेग घेतला आणि सकाळी 11.30 च्या सुमारात मुख्यमंत्र्यांचा ताफा तेथून बाहेर पडला. उपस्थितांना वाटले मुख्यमंत्री मुंबईला परतले म्हणून. परंतु असे सहज परत जातील ते मुख्यमंत्री थोडेच होते. त्यांच्यातला मदतीला धावून जाण्याचा ‘कार्यकर्ता’ या मोठया घटनेतही जागा होता.  रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घारगे यांच्या गाडीतून ते पुन्हा घटनास्थळी रेनकोट घालून आले. गडाच्या खाली उपस्थितांना त्याची कल्पना आली नाही. कारण मुख्यमंत्र्यांचा ताफा नव्हता आणि अचानक मुख्यमंत्री घटनास्थळाकडे चालू लागले. ते थेट इरशाळवाडीत पोहोचले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button