राज्य

सोलापूर जिल्ह्यातील शिंदे गट ,काँग्रेस आणि भाजपा मधील अनेक पदाधिकाऱ्य्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

संपुर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला

“पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

“पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क” प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र) सहसंपादक

सोलापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचे आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला.

,शिंदे गटातील उपजिल्हाप्रमुख दीपक खंडागळे, शिंदे गटातील आमदार शहाजी पाटील यांचे निकटवर्तीय आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील, भारतीय जनता पार्टीचे पंचायत समिती सदस्य आणि सरचिटणीस दत्तात्रय मुंडे,भाजपाचे गोरख पवार, माळशिरस मधील भाजपाचे पदाधिकारी भाऊ मगर,सचिन कदम, नागनाथ मगर, दत्ताजी बोडरे, पृथ्वीराज मगर, यश धोत्रे,शैलेश पवार, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे सरपंच कृष्णा बेहेरे, सदस्य अनिल बेहेरे ,बाबासो आईवळे ,आणि अनेक भाजपमधील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये मातोश्री येथे शिवबंधन बांधून प्रवेश केला, त्यावेळेस शिवसेनेचे नेते, सचिव ,खासदार, श्री विनायकजी राऊत, शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा. बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ,जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे,तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे, संतोष राऊत,शहर प्रमुख कमरुद्दीन खतीब, उपतालुकाप्रमुख भारत मोरे, तुषार इंगळे, असलम मुलानी,गणेश कांबळे,महादेव बंडगर, सोमनाथ देशमुख, त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button