वृद्धाश्रम नसावेत……… पण असणेही तेवढेच गरजेचे!

स्वार्थी करमकर
न्यूज रिपोर्टर
महिला प्रतिनिधी
पोलिस की आवाज
श्री. क्षेत्र अदासा येथे जाण्याचा योग आला महागणपतींच्या दर्शनानंतर टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमात भेट देऊन तेथील पदाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आश्रित असलेल्या ज्येष्ठांशी हितगुज केली तेव्हा मन भरून आले. एकीकडे पाश्चात्य संस्कृतीवर आधारित असलेले फादर, मदर डे च्या दिवशी विविध समाजमाध्यमांवर खूप उतू जात असलेले प्रेम दिसते तर दुसरीकडे भारतीय संस्कृतीतील संयुक्त कुटुंब पद्धती आठवतेय.

पण तेथील परिस्थिती पाहता हे केवळ वीव्ह, लाईक व सबस्क्राईब पुरतेच मर्यादित असल्याचे चित्र समोर आले. माझी बायको माझी मुले व माझ माझ करत बसुन मला जन्माला घालणारे, आपल रक्त आटवून माझं भरण पोषण करणारे, मला मी पण आणणार्या आपल्या माय- बापाला वाडीत टाकणारे निष्ठुर, निर्दयी पाल्य या जगात आहेत हे दिसले. तेथे असणारी मंडळी खुप दूरवरची नसून शंभर एक किलोमीटर अंतरावरील असल्याचे त्यांच्या सांगण्यावरून लक्षात आले. एकही मूलबाळ नसलेल्यासाठी वृद्धाश्रम म्हणजे वरदानच जणू पण असणार्यांना ती कारासम. वृद्धाश्रम हे खाजगी असून देखील आश्रमातील राहणे, नाश्ता, भोजन व आरोग्य व्यवस्था योग्य अणि कमालीची होती हे विशेष. वरील अनुभव लक्षात घेता वृद्धाश्रम नसते तर काय झाले असते असा एक प्रश्न मनात येतो तर. दुसरा प्रश्न आपल्या आई वडीलांना त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना भार न समजता जवाबदारी समजली तर कदाचीत असल्या वृद्धाश्रमाची गरज नसती…….. वृद्धाश्रम नसावेत……… पण असणेही तेवढेच गरजेचे




