जिल्हा परिषद हायस्कूल नाकाडोंगरी मध्ये गुणवत्ता पुर्ण शिक्षण असल्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांचे सर्वांगिण विकासासाठी जि.प.शाळेमध्ये प्रवेश घ्यावा:-मुख्याध्यापक श्री.के.एस. ईनमुलवार

संपुर्ण विदर्भात झपाट्याने वाढत असलेला
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
मिळालेल्या माहितीनुसार
जिल्हा परिषद हायस्कूल येथे गुणवत्तापूर्ण शिक्षण :-
नाकाडोंगरी येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे इ. 5 ते 12 चे वर्ग असून इ. 11 वी व 12 वी ला कला आणि विज्ञान शाखा आहेत. 2022-2023 या सत्रामध्ये श्री के. एस. इनमुलवार यांनी मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळली तेव्हापासून शाळा प्रगतीपथावर आहे. श्री राजूभाऊ देशभ्रतार जि. प. सदस्य हे शाळा समितीचे अध्यक्ष असून श्री प्रमोदजी गौपाले हे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. 2022-2023 या सत्रामध्ये इ. 5 वीचे 8 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले. अदानी पावर कं. तिरोडा ने दोनदा शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यास भेटीसाठी स्वखर्चाने आमंत्रित केले. यंदा इ. 10 विचा निकाल 93%लागलेला असून 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 100% व कला शाखेचा निकाल 94% लागलेला आहे. इ. 10 व 12 ला याच शाळेचे विद्यार्थी नाकाडोंगरी केंद्रातून टाॅपर आहेत. भंडारा येथे पार पडलेल्या मॅराथॉन स्पर्धेमध्ये सुद्धा या शाळेतील इ. 8 व 9 चे विद्यार्थी सहभागी झाले होते.

या शाळेमध्ये गुणी व प्रशिक्षित असा शिक्षकवर्ग असून नवोदय, शिष्यवृत्ती, एन. एम. एम. एस., स्पर्धा परिक्षा इ. चे वर्ग त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात. या शाळेतील विद्यार्थी क्रिडा स्पर्धेत जिल्हा स्तरावर पोहचलेले आहेत. खेळाचे प्रशस्त मैदान. सि. सि. टिव्ही, भरपूर क्रिडासाहित्य हे या शाळेची वैशिष्ट्ये आहेत. शाळा समिती व शाळा व्यवस्थापन समिती चे सहकार्य व पालकांचा पाठिंबा यामुळे ही शाळा उत्तरोत्तर प्रगती करत आहे.या शाळेत इलेक्ट्रॉनिक्स व हेल्थकेअर हे विषय शिकवले जातात.
पालकांनी आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी या शाळेत प्रवेश घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक श्री के. एस. इनमुलवार यांनी केलेले आहे.
मुख्याध्यापकांनी शाळेच्या प्रगती चे संपूर्ण श्रेय आपल्या गुणी शिक्षकवर्गाला दिलेले आहे.
