जिल्हा

तुमसरच्या नगरपरिषद मधिल पाणीपुरवठा विभागाची ४७ कोटी रुपयाची योजना निष्फळ

  • पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची तडफड
  • अनेक प्रभागात ५ दिवसापासून पाणी पुरवठाच नाही
    तुमसर:– शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण नलिकेत मोठया प्रमाणात गाळ साचल्याने शहरातील काही प्रभागात पाणीपुरवठा मागील पाच दिवसापासून ठप्प पडलेला आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे पाणीपुरवठा योजना शहराला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी असमर्थ ठरत असल्याने तुमसरकराना भर उन्हाळ्यात पाणी टंचाईची धग जाणवत आहे. परिणामी पाण्यासाठी महिलांची तडफड सुरु आहे. तुमसर शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ४७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्या योजनेचे २ वर्षा
    अगोदर मोठ्या थाटात योजनेचे लोकार्पण ही घेण्यात आले. मात्र त्या योजनेचा पाण्याचा एक थेंब ही तुमसर कराना मिळणे तर सोडाच दिसणे ही दुर्लभ झाले आहे. ््

न्युज पेपर शिघ्र प्रकाशित होत आहे

“पोलीस कि आवाज “


  • वर्षानुवर्षे माडगी येथून जीर्ण झालेल्या जुन्याच पाइपलाइनद्वारे तुमसर शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. जुन्या पाइपलाइनमधून नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा तर होत नाही. उलट चार चार पाच पाच दिवस अनेक प्रभागात पाणी पुरवठा होत नसल्याने नगर परिषद प्रशासनाला नागरिक वैतागले आहेत .
    शहरातील शिव शिवाजी नगर, शहर वार्ड , गोवर्धन नगर , श्रीराम नगर आदी भागात गत पाच दिवसांपासून नळाला पाणी नाही. महिनाभऱ्यातून केवळ आठ दिवस पाणीपुरवठा केला जात असल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी खाजगी टँकर कडे धाव घ्यावी लागते. महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने अनेकदा वादावादीचे प्रसंग निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांनी नगर परिषदेच्या कार्यप्रणाली बद्दल रोष व्यक्त केला आहे. नगरपरिषदेने तत्काळ नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून सकाळ-संध्याकाळ नागरिकांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
    गेल्या काही वर्षापासून पाणीटंचाईची समस्या सहन केलेल्या नागरिकांची सहनशीलता आता संपली आहे. उन्हाळ्यात नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांच्या असंतोषाचा स्फोट होण्याची शक्यता आहे. यास नगर परिषद प्रशासन जबाबदार राहणार.
    अभिषेक कारेमोरे
    माजी नगराध्यक्ष तुमसर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button