जिल्हा

पावसाळ्यापूर्वी नाल्या सफाई करुन मोकळे नाल्या मोकळे करा -माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे

  • पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करून मोकळे करा
  • माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांचा प्रशासनाला ईशारा
    (फोटो:– अभिषेक कारेमोरे)

तुमसर :- पावसाळा तोंडावर आला असतानाही नगर पालिकेने कुठल्याही उपाययोजना सुरू केल्या नाहीत, मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता त्यावेळी या शहरातील नाल्यांचे पाणी गोवर्धन नगर श्रीराम नगरातील नागरिकांच्या घरामध्ये शिरले होते.त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. त्याच घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नगर पालिकेने सर्व नाल्यांची साफसफाई करून ते मोकळे करा, अशी मागणी करत विनंती वजा इशारा ही माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.


प्रभाग क्रमांक १० व प्रभाग क्रमांक ११ मध्ये राजाराम, शकुंतला व दीनानाथ मंगल कार्यालय आहेत. गोवर्धन नगर इंदिरा नगर श्रीराम नगर , तामसवाडी , शिवाजी नगर आदी या भागातून लहान-मोठे अनेक ओढे-नाले एका मोठ्या नाल्यातून वाहतात.परंतु त्या मोठ्या नाल्यावर तसेच अनेक नाली, नाल्यावर अतिक्रमण करण्यात आले आहेत व आता ते नाले पण तुडूंब चिखलाने भरले आहेत. त्यांची साफसफाई होणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या पावसाळ्यात नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरून गतवर्षपेक्षा या वर्षी नागरिकांचे मोठे हाल होतील.आर्थिक नुकसानी बरोबर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन या प्रभागात साथीचे आजार पसरतील पावसाळा आता दहा ते पंधरा दिवसांवर आला आहे.परंतु नगर पालिका प्रशासनाच्या वतीने नाल्यांच्या साफ-सफाई बाबत कुठलीही हालचाली दिसत नाही कोणतेही नियोजन दिसतं नाही केवळ मलाई चे कामे करतांना दिसत आहेत.

पालिका प्रशासनाने हे सर्व कामे बाजूला सारून आधी पावसाळा पूर्वी नाले सफाई केली नाही तर नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण तर होईलच त्याच बरोबर प्रभागात साथीचे आजार पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल व मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागेल. हे तुमसरकराना सहन होणार नाही. असे जर झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मोठे आंदोलन केले जाणार असल्याचा इशाराही माजी नगराध्यक्ष
अभिषेक कारेमोरे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button