जिल्हा

तुमसर मोहाळी मध्ये कोतवाल व पोलीस पाटील भरती मध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करुन दोशी अधिकाऱ्यांना निलंबित करा -ऑल ईन्डिया स्टुडन्ट फेडरेशन

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार 2023 च्या झालेल्या कोतवाल व पोलीस पाटील भरती प्रकरणात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यासाठी ऑल इंडिया स्टुडटंस फेडरेशन तर्फे SDO कार्यालय तुमसर च्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे.


त्यांचा मागण्या अशा की, प्रश्न पत्रिकेचे चुकीचे स्वरुप, प्रश्न पत्रिकेत अनेक चुका,आदर्श उत्तर पत्रीकेतील अनेक चुका, प्रश्न पत्रिका वर्ग चौथ्या अभ्यासक्रमावर आधारीत न काढता चुकीच्या पद्धतीने काढलेली प्रश्न पत्रिका, पोलीस पाटील व कोतवाल पदाशी संबंधित विषयावर अनुसरुन मुलाखत न घेणे, गुणवत्तेनुसार अंतिम यादी ठरवलेल्या वेळेनुसार प्रकाशित न करणे, वेळेच्या आधीच आदर्श उत्तर पत्रीका पोर्टल न देता परिक्षा केंद्राच्या भिंतीवर लावणे, आपल्या जाहीरनाम्यातील नियमांचे उल्लंघन करने, परिक्षार्थी वारंवार समितीकडे आक्षेप नोंदविण्यासाठी गेले असता त्यांचे निवेदन न स्वीकारणे अशाप्रकारच्या विविध मांगण्या केल्या असुन योग्य ती कारवाई करुन परिक्षार्थी वर अन्याय होणार नाही व त्यांना न्याय मिळेल याकरिता फेरपरीक्षा घेण्यात येऊन

दोशी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे.

अशी मागणी केली.

.


त्यांनी प्रतिलीपी माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, विरोधी पक्ष नेते, महसुल मंत्री, आमदार तुमसर मोहाळी विधानसभा, माननिय विभागिय आयुक्त नागपुर, माननिय पोलीस अधीक्षक भंडारा, उपविभागीय अधिकारी तुमसर, तहसील कार्यालय तुमसर/मोहाळी, पोलीस निरीक्षक तुमसर/मोहळी, उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर यांना देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button