राज्य

१ मे रोजी मुख्य शासकीय समारंभासाठी कार्यक्रमाची रंगीत तालीम

® पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ®

मुंबई, वार्ता : 

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 1 मे रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी सहसचिव तथा सह मुख्य राजशिष्टाचार अधिकारी रामचंद्र धनावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत आणि राज्यगीत गाऊन राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली.

सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार), महाराष्ट्र राज्य यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

याप्रसंगी गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग, पोलीस सह आयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button