राज्य

भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही स्टेशन मधिल प्रकरण :- एका पोलीस कर्मचाऱ्याने केला संपादकाचा अपमान!

निलंबित करण्याची मागणी ; सोमवारी २३ ला एसपी लोहित मतानी यांची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा भंडारा यांनी भेट घेतली,त्यांनी दिले कार्यवाही चे आश्वासन

भंडारा : तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशनचे

मा. पोलीस कर्म- चारी सनी कुकडे

यांनी

पोलीस की आवाज चे मुख्य संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भंडारा जिल्हा संपर्कप्रमुख राजेश नारायण उके राहणार नाकाडोंगरी हे दिनांक १० जानेवारी २०२३ ला गोबरवाही पोलीस ठाण्यात बातमी संकलन करीता गेले होते. रवी जाईभाई यांच्यासोबत भेटले असताना त्यांनी पत्रकारास चहा पिण्यासाठी आग्रह केला त्यामुळे ते त्या ठिकाणी ते थांबले .परंतु तेथील स्टेशन डायरीवर उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी सनी कुकडे यांनी पत्रकार राजेश उके यांच्यासोबत अभद्र व्यवहार करून सदर पत्रकारास ब्लॅकमेलर म्हनुन अपशब्दाचा वापर केला त्यानंतर थोडीफार शाब्दीक संवादही झाला.

त्यानंतर बाहेर निघुन सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. नितीन मदनकर सा. यांच्यासोबत मोबाईलवर मा. ऊके यांनी ह्याबाबत आपबिती सांगितली.

त्यानंतर तेथे उपस्थित असलेले

मा.रवी जाईभाई (पोलीस सिपाई)

यांनी तेथून सदर संपादकास निघुन जाण्यास सांगितले.

त्यानंतर ते घरी निघून गेले. या पद्धतीचा अपमान पोलीस सनी कुकडे यांनी केला व अपमानास्पद वागणूक सदर पत्रकारासोबत केली .यासंबंधीची लेखी तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री , गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,आई. जी.नागपुर व डीजीपी मुंबई ,यांच्याकडे लेखी पत्रकाद्वारे केली असून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे .व पोलीस सनी कुकडे यांना निलंबित करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे .

सदर पत्रकारासोबत अपमानास्पद वागणूक केलेल्या पोलीस शिपाई कुकडे यांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे निषेध करण्यात येत असून सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात येऊन पोलीस शिपायावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य तर्फे करण्यात येत असून याबाबद संघ सोमवारी २३ जानेवारीला जिल्हा मा.पोलीस अधीक्षक लोहित मतानी साहेब यांच्यासी या विषयावर भेट घेतली.

ह्यानंतर आधंळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.राजकुमार यांच्याकडे चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

बातमी वारंवार प्रकाशित होताच परिसरातील सर्व जनतेचे लक्ष वेधले आहे की पोलीस प्रशासन कोणते पाऊल उचलतोय?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button