देश

अपघात टाळण्यासाठी वाहन धारकांनी रस्ता सुरक्षा नियमाचे पालन करावे, सर्व शासकीय कार्यालयात हेल्मेट सक्ती,पदचाऱ्याने रस्त्यावर उजव्या बाजुने चालावे:-जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

भंडारा, राजेश ऊके(पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क): अपघात टाळण्यासाठी वाहन धारकांनी  वाहन चालवितांना रस्ता रूरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करणे अपेक्षित असून स्वत: व इतरांच्या आयुष्याची काळजी घ्यावी. दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेट आणि चार चाकी वाहन चालवितांना सिट बेल्ट वापरावे, पादचाऱ्यांनी रस्त्यावर उजव्या बाजूने चालावे,

असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीयय महामार्ग प्राधिकरण विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियान 2023 च्या उद्घाटन समारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते.

यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. डि.के.सोयाम, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांच्यास‍ह वाहतूक, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रमुख उपस्थित होते.

रस्ते अपघातांची व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही बाब निश्चितच गंभीर आहे. अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. कुटुंबातील करता व्यक्ती अपघातात दगावल्यामुळे कुटुंबावर विपरीत परिणाम होतो. अपघातामुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्य व नेत्र तपासणी करणेही आवश्यक आहे. जिल्ह्यात मागील पाच वर्षात अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून 2018 ते 2022 पर्यंत जिल्ह्यात एकूण 1900 अपघात झाले. या अपघातात 700 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 1000 गंभीर जखमी झाले. 18 ते 45 वयोगटातील नागरिकांच यात जास्त प्रमाण आहे. दर वर्षी 140 व्यक्तींचा मृत्यू तर 200 गंभीर जखमी होतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button