जिल्हा

अड्याळाचे सरपंच शिवशंकर मुंगाटे जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणार काय ?

उपसरपंच शंकर मानापुरे विरोधक गटाचे

संजीव भांबोरे{पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क}
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले अड्याळ ग्रामपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक पार पडली .या ग्रामपंचायतची लोकसंख्या जवळपास 12000 जवळपास असून मतदारांची लोकसंख्या ७ हजाराच्या वर आहे .या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून शिवशंकर मुंगाटे यांना गावातील नागरिकांनी यांच्यावर विश्वास दाखवीत निवडून दिले. येथील ग्रामपंचायत मध्ये एकूण ६ वार्ड असून १७ ग्रामपंचायत सदस्य आहेत. परंतु त्यांनी जनतेला दिलेल्या जाहीरनाम्यात खरे ठरतात काय ?यांच्याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष आहे .त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात जनतेला पिण्याच्या पाण्याची शुद्धीकरण पूर्ण समतेने राबविणार, प्रवाशांच्या सोयीकरता प्रवासी निवारा तयार करून देणार ,ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक योजनेचा लाभ मिळवून देणार ,गावातील अपूर्ण राहिलेल्या नवीन नळ पाईपलाईन तातडीने पूर्ण करण्यात येईल ,मनरेगा अंतर्गत जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार, ग्रामपंचायत अंतर्गत गृह उद्योग करिता प्रशिक्षण आणि प्रोत्साहन करणार, कांजसहाऊस ते कन्या शाळेपर्यंत व्यापारी संकुल तयार करणार, हनुमान मंदिर रोड प्रवेशद्वार, मंडई पेठ प्रवेशद्वार, बाजारपेठ प्रवेशद्वार , शीतला माता प्रवेशद्वार, विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रवेशद्वार ,सहायता नगर प्रवेशद्वार इत्यादी ठिकाणी उभारण्यात येईल, गावातील तलाव , बोड्यांचे सौंदर्यकरण, सार्वजनिक शौचालय, प्रसाधन गृह पूर्ण सोयी सुविधा युक्त करणे, गावातील कचरा ,साफसफाई करिता डम्पिंग यार्ड योग्य वापर, ग्रामपंचायत अंतर्गत कृषी विभाग यांच्याकडून मार्गदर्शन मेळावा आणि कृषी योजनांचा नागरिकांना लाभ ग्रामपंचायत मार्फत राबवणार ,लहान मुलांकरता बालोद्यान, ग्रीन जिम प्रत्येक वार्डात उभारणार, क्रीडा संकुल उभारणार, मशान भूमीकरिता व कब्रस्तान चे सौंदर्यकरण करणार, मशानभूमीपर्यंत पक्का रस्त्याची निर्मिती करणार ,घरकुलांचे प्रश्न मार्गी लावणार ,गावातील रस्ते याची गुणवत्ता सुधारण्याकरता जास्तीत जास्त लक्ष देणार ,अशी अनेक प्रकारची आश्वासनाची खैरात जनतेला देऊन जनतेने त्यांच्यावर विश्वास संपादन करून जनतेला दिलेल्या आश्वासनात कितपत खरे ठरतात हे येणाऱ्या पुढील वर्षात आपल्याला प्रत्यक्षात दिसेलच. परंतु साथीदार ग्रामपंचायतच्या झालेल्या उपसरपंच च्या निवडणुकीत विरोधी गटाच्या उपसरपंच शंकर मानापुरे निवडून आल्याने एकमेकांना विश्वासात घेऊन विकासाची दिशा ठरवतात की काय? हे येणारा काळच सांगेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button