देश

भारतातील १ राष्ट्रीय प्रवासी कवी संमेलनाचे आयोजन

संजीव भांबोरे
नासिक (ऑल इंडिया प्रतिनिधी) दि.3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2023 रोजी भारतातील 1ले राष्ट्रीय प्रवासी कविसंमेलन (नाशिक ते गोवा ) जागतिक कवी व साहित्यिकांचे हक्काचे विचारपीठ असणारे पुष्परत्न साहित्य समूह, नाशिक तर्फे होत असून,महाराष्ट्र व विविध राज्यातील साहित्यिकांनी नावे नोंदवली आहेत.3 ते 5 फेब्रुवारी 2023 सर्वजण एकत्र राहणार आहे. एकमेकांच्या कविता, विचार, साहित्य जाणून घेणार आहेत. तसेच गोवा राज्याची, निसर्गाच्या सांनिध्यात तेथील संस्कृती, भाषा, साहित्य जाणून घेणार आहोत.विशेष म्हणजे कवी, साहित्यिकांना एक वेगळ्या प्रकारे जाणून घेणार आहोत.हा एक वेगळाच अनुभव राहणार आहेत.
पुष्परत्न साहित्य समूह नाशिक चा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी कविसंमेलन व पुष्परत्न काव्य गौरव सन्मान सोहळा आयोजित केला जातो या फेब्रुवारी महिन्यात पहिल्या रविवारी म्हणजेच 5 फेब्रुवारी ला गोवा राज्यात, मुरगाव हायस्कूल वास्को येथे आयोजन केलेले असून या कविसंमेलन व सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष मा. विनायक खेडेकर ( गोवा राज्य,ब्रँड अंबे्सिडर, भारत सरकार पद्मश्री पुरस्कार प्राप्त, जेष्ठ साहित्यिक) व प्रमुख पाहुणे मा. संजय ढवळीकर (गोवा राज्य माहिती आयुक्त ) व मा. तुलशीदास देसाई (मुख्याध्यापक,मुरगाव हायस्कूल, वास्को, गोवा ) इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे.जास्तीत जास्त कवी साहित्यिकांनी याचा आस्वाद घ्यावा.आणि जास्तीत जास्त कवी, साहित्यिकांनी सहभागी व्हावे व उपस्थित रहावे असे आवाहन या संपूर्ण संमेलनाचे आयोजक, प्रा. डॉ. आनंद आहिरे(आयोजक तथा अध्यक्ष, पुष्परत्न साहित्य समूह, नाशिक व राष्ट्रीय कार्याध्यक्ष, अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद आणि आजीवन सदस्य, विश्व मराठी साहित्य परिषद ) यांनी केलेले आहे. संपर्क -7387386492

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button