राज्य

यश कल्याणी सेवा भवन संस्थेच्या विश्वस्त मा. सौ. शितलताई करे पाटील यांचा वाढदिवसानिमित्त

पोलीस की आवाज न्यूज वार्ता प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र) सह संपादक

करमाळा यश कल्याणी सेवा भवन मध्ये संस्थेच्या विश्वस्त मा. सौ. शितलताई करे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या शैक्षणिक कार्यक्रमासाठी Interactive smart flat panel बसवला, त्याचा शुभारंभ आज सर्व माता भगिनींच्या हस्ते करण्यात आला. इंटरएक्टिव्ह स्मार्ट प्लॅट पॅनेल ६ प्रमुख उपकरणांची कार्य समायोजित करतो, संगणक, प्रोजेक्टर, बोर्ड, साइनेज, स्पीकर, आणि टी व्ही, यामुळे कंटाळवाणे विषय शिकवणे सुद्धा आनंददायी होते, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा फार मोठा फायदा होतो, तसेच विशेष करुन प्रशिक्षण, विविध कार्यशाळा , सेमिनार, संशोधन शिबीर विज्ञान कार्यशाळेसाठी याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करता येतो, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. गणेश भाऊ करे पाटील यांनी सांगितले. यावेळी उपस्थित डॉ. निलेश मोटे, श्री. शहाजी मोहळकर सर श्री. अनिल शेंडे आणि मुख्याध्यापक विक्रमजी राऊत सर, व महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button