राज्य
उपसरपंचाच्या निवडणुकीत मृत व्यक्तीची महापुरुषांची बरोबरी
बीड जिल्ह्यातील बेनसुर ग्रामपंचायत मधील प्रकार

संजीव भांबोरे
बीड (ऑल इंडिया प्रतिनिधी) जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामधील असलेल्या बेनसुर ग्रामपंचायत मध्ये उपसरपंचाच्या निवडणुक दिवशी दिनांक 29/12/2022 रोजी मृत व्यक्तीचा फोटो महापुरुषाच्या बरोबरीने लावून महापुरुषांचा अपमान केलेला आहे या प्रकरणाची चौकशी करण्यात येऊन दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी यावेळी प्रत्यक्षात ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) उपस्थित असताना महापुरुषांच्या फोटोच्या बाजूला गावातील मृत्यू व्यक्तीचा फोटो बाजूला लावून छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी महापुरुषांचा अपमान केलेला आहे.

त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महापुरुषांच्या अपमान केल्यामुळे व सर्वसामान्य जनतेच्या भावना दुखावल्यामुळे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे .




