यश कल्याणी संस्थेतर्फे करमाळा इथे दिवाळी पहाट व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन – प्रा. गणेशभाऊ करे पाटील


पोलीस की आवाज न्यूज वार्ता करमाळा : महाराष्ट्र सह संपादक-प्रमिला जाधव

करमाळा यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा. गणेश भाऊ करे पाटील यांच्या संस्थेच्या माध्यमातून आनेक समाजपयोगी कार्यक्रम राबवत असतात, याप्रमाणे यंदा ही बुधवार दिंनाक २६ आॅक्टोबर रोजी दिवाळी पाडव्यानिमित्त करमाळा शहरातील रसिक श्रोत्यासांठी पुणे येथील पार्श्वगायक प्रवीणकुमार अवचर यांच्या संगित मैफलिंचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमात संगित गित, भावगीत, नाट्यगीते, भजन, कवाली, अभंग तसेच हिंदी चित्रपट गितांचा घेता येणार आहे, कार्यक्रमाचे निवेदन पुणे येथील प्रसिद्ध टि. व्ही. अॅकर श्रीमती रत्ना दहिवलेकर या करणार आहेत, त्यांच्या सोबत जागतिक दर्जाचे गायक, गायिका,वादक, या मैफलीत त्यांची साथ देणार आहेत यावेळी यश कल्याणी सेवाभावी परिवाराच्या वतीने नावलौकिक गुणवंताना पुरस्कार देण्यात येणार आहेत, हा कार्यक्रम यश कल्याणी परिवाराच्या प्रांगणात होणार आहे,या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील सर्व जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी लाभ ध्यावा असे आवाहन प्रा. गणेश भाऊ करे पाटील यांनी केले आहे.




