“माहितीचा अधिकार अधिनियम-2005″काय-दा अंतर्गत दिलेला अर्ज पाथरी ग्रामपंचायत द्वारा कचरापेटीत



★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता★भंडारा जिल्ह्यातील तुमसर पंचायत समिती अंतर्गत पाथरी ग्रामपंचायत मधील ग्रामसेवकाला पोस्टाद्वारे रजिस्टर पोस्ट प्राप्त झाले असून अर्जदाराला”माहिती चा अधिकार ,अधिनियम-2005″माहिती न देता त्या अर्जाला कचरा पेटीत टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले.
अर्जदार हाRTIकार्यकर्ता असल्याने त्याला पुढील वाटचालीचा सविस्तर अभ्यास असल्याने तो अर्जदार खंडविकास अधिकारी तुमसर यांच्याकडे अपिल करण्याचे निदर्शनास येत आहे.
सरकारी अधिकारी व कर्मचारी हा अठ्ठावन वयोमर्यादापर्यंत नोकरी करुन सरकारला सेवा देत असतो परंतु ह्या कर्मचाऱ्यांना कायद्याची का जाणीव नाही? असा प्रश्न परिषरातील जनतेमध्ये निर्माण झाला.
गावातील जनता गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सरपंच आणि सदस्य गण यांची निवड करतात.
गावातील कामे निटनेटकी ,सुरळीतपणे व पारदर्शकता येण्यासाठी ग्रामसेवकाची नेमणूक करण्यात येते.
ग्रामसेवक झालेल्या कामाची माहिती “माहिती च्या अधिकार अधिनियम-2005″अंतर्गत न देने म्हणजे कायद्याचा उल्लंघन करने होय!
ग्रामसेवकाकडुन”माहिती चा अधिकार अधिनियम-2005″उल्लंघन करणार हि अपेक्षा जनतेला नव्हती.
कोण पुठारी त्या ग्रामसेवकाला बढावा देतोय कायद्याचे उल्लंघन करण्यासाठी ह्याकडे सर्व जनतेचे लक्ष केन्द्रित आहे





