क्राइम

भंडारा जिल्ह्यातील हसारा टोली खुन प्रकरण:-तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत एक खुन्हाचा गुन्हा घडला

तुमसर शहराजवळील हसारा टोली येथिल घटना.

संजीव भांबोरे//राजेश ऊके(मुख्य संपादक, पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क)
भंडारा( ऑल इंडिया प्रतिनिधी) तुमसर शहराला लागून असलेल्या जुन्या हसारा टोली येथे . शुल्लक कारणावरून घडलेल्या वादातून ईसमाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सदर घटना शुक्रवार ७ ऑक्टोंबरच्या ६:३० वाजे दरम्यान घडली असून धारधार सुरीने डोक्यावर व मानेवर सपासप वार करून हत्या करण्यात आलेल्या ईसमाचे नाव विजय श्रीराम नखाते(५२, राह.हसारा टोली) असून अटक करण्यात आलेल्या आरोपी भावंडांमध्ये गणेश बरेकर(३०), कृष्णा बरेकर(२७) दोघेही राह.हसारा टोली यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतकच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आरोपींचे दोन दिवसाअगोदर भांडण घडले होते. त्यातूनच हत्येचा थरार घडल्याची प्राथमिक माहिती तुमसरचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी दिली आहे.

●●●असे खुनाचे गुन्हे तुमसर शहरात व तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत का होतात ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले ह्यामध्ये दोशी कोण याचा शोध लावने अती आवश्यक आहे●●●

तुमसर शहराला लागूनच असलेली हसारा टोली येथे शुक्रवारीच्या सायंकाळी ६:३० दरम्यान स्थानिक बौद्ध विहार जवळ विजयच्या हत्येचा थरार घडला. घटना घडताच परिसरात स्मशान शांतता पसरली. घटनेची माहिती तुमसर पोलिसांना मिळताच त्यांनी घटना स्थळ गाठले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतक विजय व जवळच हत्येत वापरण्यात आलेले हत्यार आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार मृतक हा पेशेने बांधकामाचे खाजगी ठेके घेऊन काम करणारा होता. त्यात विजयच्या सूपरिचयाच्या आरोपी कृष्णा व गणेश यांचे कामाच्या ठिकाणी घटनेच्या दोन दिवसा पूर्वी शुल्लक वाद घडून आले होते. तेच शाब्दिक वाढ विकोप्याला जाऊन सदर हत्येचे थरार घडल्याची माहिती मृतकच्या लहान भावाने व मुलाने पोलिसांना दिली. घटना स्थळी दाखल पोलीसांनी हत्येची नोंद घेऊन तपास फिरवताच दोन्ही आरोपी भावांना अटक केली.

अशा निर्दोष व्यक्तींची हत्या केव्हा पर्यत होणार!

ह्या मागे दोशी कोण शासन की प्रशासन?

असे मर्डर चे गुन्हे होऊ नये म्हणून तुमसर पोलीस स्टेशन काय उपाययोजना करेल असा सवाल★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★करत आहे.

ह्या विषयावर परिसरातील जनतेचे लक्ष वेधले आहे.ह्या खुनामध्ये उच्चस्थरिय जांच होणे अतिआवश्यक आहे.

अशा खुनाच्या गुन्ह्यामध्ये अधिकारी मस्त कुंभकर्णी झोपेत आहे. असे खुन तुमसर व परिसरात व्हायला नाही पाहिजे ह्याकडे पोलीस प्रशासन काय पाऊल उचलतोय ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशा खुन्हाच्या घटना का जास्त होतात असा शोध ★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★टीम घेत आहे व वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिपोर्ट देणार आहे.

राज्य शासनाने उच्चस्थरिय कमिटी तयार करुन संपूर्ण जांच करायला पाहिजे.

ही बातमी ग्रुहमंत्रालय पर्यंत वायरल होने अतिआवश्यक आहे जेनेकरुन दोशी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावर कार्यवाही होने आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button